Shivneri Fort | किल्ले शिवनेरी | संपूर्ण इतिहास व माहिती
किल्ले शिवनेरी (Shivneri Fort)
आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या वंदनीय व लाडक्या राजाच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला अर्थात किल्ले शिवनेरीला. समजून घेणार आहोत शिवनेरी किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. अनुभवणार आहोत शिवनेरीचा इतिहास.
इ.स. 1443 मध्ये मलिक उल तुझार याने यादवांचा पराभव केला व शिवनेरी बहमनी राजवटीखाली आला. पुढे इ.स. 1440 मध्ये निजामशाहीची स्थापना झाली व पुढे इ.स. 1470 मध्ये मलिक उल तुझारचा प्रतिनिधी मलिक मुहम्मद यांनी किल्ला सर केला. इ.स. 1493 मध्ये इथली राजधानी अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स.वी सन 1565 मध्ये निजामाने त्याचा भाऊ कासीम याला गडावर कैदेत ठेवले. पुढे इ.स. 1595 मध्ये शिवनेरी किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजांचे वडील यांच्याकडे आला.
पुढे इ.स. 1629 मध्ये विजयराव सिधोजी विश्वासराव ही शिवनेरीचे किल्लेदार होते. ते जिजाऊंच्या नात्यातले होते, शहाजी राजे यावेळी युद्धाच्या धामधूमीत असल्याने त्यांनी मासाहेब जिजाऊंना गर्भावस्थेमध्ये शिवनेरीवर आणले व पाचशे स्वार त्यांच्या संरक्षणासाठी ठेवले आणि तो दिवस उजाडला उभा प्रांत आनंदाने नाहुन निघाला. शिवपूर्वकाळ इतका भयानक होता यादवांच्या राजांचा ऱ्हास नंतर मोगलांच्या यवनी अन्याय अत्याचारांच्या नात्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता भरडून निघाली होती. या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणूस प्रत्येक माऊली त्या देवीकडे एकच मागणं मागत होती. या दुष्टांचा संहारक म्हणून आई भवानी तू अवतार घे..
कोळी चौथरा
मराठ्यांचा धारातीर्थ, शिवनेरीवरील सर्वात दुर्लक्षित स्थान येथील घडलेल्या घटनेवरून आपल्याला मोगलांच्या क्रौर्याची अनुभूती येते. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन या गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या महादेव कोळी लोकांनी शिवनेरी ताब्यात घेतला..
संपूर्ण हिंदुस्थानला शिवजन्माची तेजस्वी साक्ष देत शिवनेरी खंबीरपणे उभा आहे व सदैव उभा राहील जय जिजाऊ... जय शिवराय जय हिंद... जय महाराष्ट्र!!!
Comments
Post a Comment