Yugandhar Marathi Book Review by Govind Joshi | युगंधर | Shivaji Sawant | Jay shri krishna
युगंधर
शिवाजी सावंत यांची आणखी एक अप्रतीम कादंबरी.मी त्यांची वाचलेली ही दुसरी कादंबरी (पहीली अर्थातच म्रत्युंजय)...म्हणुन उत्सुकतेपोटी आणी खरं सांगायचं तर ही माझ्या मिञाची (ज्ञानेश्वर पठाडे) सर्वात आवडती कादंबरी...तो रोज या पुस्तकाचे पारायण करायचा...ते पाहुन मला हे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली...आम्ही दोघांनी अक्षरश: या कादंबरीतील प्रत्येक प्रसंगावरती चर्चा केल्या आहेत.इतकं सुंदर हे पुस्तक आहे.
ही कादंबरी वाचायला सुरूवात केली आणी भगवान श्रीकृष्णाचा व माझ्या मनाचा संवाद सुरू झाला.या
आधी कितीतरी चरीञकारांनी श्रीकृष्णाचं चरीञ साकारलयं अवतार,चमत्काराच्या अट्टहासाने त्यांनी त्याला आपल्यापासुन शेकडो योजनं दुर नेलं.हे त्यांनी मुद्दाम केलं असं मला म्हणायच नाही....भारतीय समाजाचा सर्वात मोठा दोष म्हणजे आपण आपल्या देवतांना चमत्कारांमध्ये आणी महापुरूषांना जातिपातीमध्ये जखडुन ठेवतो. या कादंबरीच वैशीष्ट्य म्हणजे वाचत असताना श्रीकृष्ण देव,परमात्मा,भगवान असा कोणी दुरचा राहत नाही,तो कधी आपला मिञ,सखा,सोबती,भावविश्वस्त होऊन जातो हे कळत देखील नाही.
आधी कितीतरी चरीञकारांनी श्रीकृष्णाचं चरीञ साकारलयं अवतार,चमत्काराच्या अट्टहासाने त्यांनी त्याला आपल्यापासुन शेकडो योजनं दुर नेलं.हे त्यांनी मुद्दाम केलं असं मला म्हणायच नाही....भारतीय समाजाचा सर्वात मोठा दोष म्हणजे आपण आपल्या देवतांना चमत्कारांमध्ये आणी महापुरूषांना जातिपातीमध्ये जखडुन ठेवतो. या कादंबरीच वैशीष्ट्य म्हणजे वाचत असताना श्रीकृष्ण देव,परमात्मा,भगवान असा कोणी दुरचा राहत नाही,तो कधी आपला मिञ,सखा,सोबती,भावविश्वस्त होऊन जातो हे कळत देखील नाही.
म्रत्युंजय व युगंधरचा आक्रतीबंध (Format) सारखाच आहे. श्रीकृष्ण, रूक्मिणी,द्रौपदी,दारूक,अर्जुन,सात्यकी,उद्धव या पाञांच्या सहाय्याने त्यांनी साक्षात श्रीकृष्ण प्रकट केला आहे. श्रीकृष्णाला देव मानुन पुजा करणे किंवा त्याच्यावर टिका करून मोकळा होणे या दोन्ही गोष्टी सोप्या आहेत पन श्रीकृष्णाला समजुन घेणे खुप अवघड आहे....तो विष्णुचा अवतार आहे, देव आहे हे एका पायावर आपण मान्य करतो पन तो शेकडो वर्ष सांगत राहीला – " मी अंशरूपाने तुम्हा प्रत्येकात नांदतो आहे. " ते मानायला माञ आपण तयार होत नाही. खरचं जर आयुष्य समजुन घ्यायचं असेल तर श्रीकृष्णाच तत्त्वज्ञान समजुण घेणं अनिवार्य आहे. कारण त्याच्या तत्त्वज्ञानाला ताजेपना आहे ते जितकं काल गरजेचं होतं त्यापेक्षा जास्त आज त्याची गरज आहे. सार्या जगताला भगवदगीतेचं अम्रत त्यान पाजलं. कोणत्याही चमत्काराविना त्या द्वारकाधीश, सुदर्शनचक्रधारी, वासुदेव भगवान
श्रीकृष्णाचे अंतरंग शिवाजी सावंतांनी उलगडलॆ आहे. त्याचे दिव्य स्वरूप तितक्याच दिव्य भाषेत त्यांनी मांडले आहे. तो चक्रवर्ती सम्राट जितका भव्य–दिव्य तितकाच आपला खुप जवळचा वाटतो...
यात अनेक प्रसंग त्यांनी खुप छान मांडले आहेत. उदा. राधा म्हणजे मुक्तीसाठी तळमळणारा जीव असं ते मांडतात, नरकासुराचा वध व कामरूपी स्ञियांची सुटका आणी त्यांच्या सोळा सहस्ञ पत्नींच रहस्य ते उलगडतात,शेवटच्या उद्धव भागात तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. देवकीचा क्रष्ण, यशोदेचा नटखट कान्हा, गोकुळातील गोपींचा प्राणप्रीय सखा, सर्वश्रेष्ठ यादव/यादवांचा नायक, जरासंध, नरकासुर, शिशुपाल, अशा अनेक असुरांना यमसदनी धाडणारा चक्रवर्ती सम्राट, सुदर्शनचक्रधारी, द्वारकाधीश, पांडवांना धर्माच्या बाजुने साथ देणारा भगवान वासुदेव, युद्धकाळात जबरदस्त पेच डावपेच खेळनारा धुर्त राजकारणी, अशी त्याची सर्व रूपे डोळ्यासमोर उभे राहतात. युगंधर हे फक्त पुस्तक नाही तो अनुभवन्याचा एक सोहळा आहे.
अर्थात यामध्ये आपल्याला शिवाजी सावंताचे भाषाप्रभुत्त्व व वाचकांना खिळवुन ठेवण्याची हातोटी मानावीच लागेल. मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हापासुन या पुस्तकाच्या प्रेमात आहे.हजारो वर्षापासुन भारतीय मन व्यापुन उरलेल्या या युगंधराला जाणुन घेनं हा एक प्रवास आहे. खरचं शिवाजी सावंत सरांनी हे पुस्तक लीहून आपल्या सिद्धहस्त लेखणीची जाणिव करून दिली आहे.या पुस्तकाबद्दल कितीही लीहिलं तरी कमीच आहे.
Great Book
ReplyDelete