Pataleshwar Cave Temple | पाताळेश्वर मंदिर | Pune Maharashtra | Incredible Maharashtra
Pataleshwar Temple देवता आकाशातील असोत किंवा पाताळातील देवांचा देव एकच महादेव. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे प्राचीन शिवमंदिर पुणेकरांना कायम आपलसं वाटत. गुहेच्या समोर एका विशाल दगडामध्ये कोरलेले नंदीमंडप आहे. मुख्य गुहा आयताकृती आहे, आधारासाठी दगडी खांब दिसून येतात या लेण्या पाहिल्यानंतर वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या ची आठवण येते. गुहेच्या मध्यभागी शिवलिंग आहे भगवान शिव यांच्या अनेक पौराणिक कथा दर्शविणारी शिल्पे या ठिकाणी पाहावयास मिळतात. हे पुण्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. जवळजवळ चारशे वर्षांहुनही प्राचीन असे हे मंदिर आहे हे राष्ट्रकुट काळात कोरलेले आहे.