Yugandhar Marathi Book Review by Govind Joshi | युगंधर | Shivaji Sawant | Jay shri krishna
युगंधर शिवाजी सावंत यांची आणखी एक अप्रतीम कादंबरी.मी त्यांची वाचलेली ही दुसरी कादंबरी (पहीली अर्थातच म्रत्युंजय)...म्हणुन उत्सुकतेपोटी आणी खरं सांगायचं तर ही माझ्या मिञाची (ज्ञानेश्वर पठाडे) सर्वात आवडती कादंबरी...तो रोज या पुस्तकाचे पारायण करायचा...ते पाहुन मला हे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली...आम्ही दोघांनी अक्षरश: या कादंबरीतील प्रत्येक प्रसंगावरती चर्चा केल्या आहेत.इतकं सुंदर हे पुस्तक आहे. ही कादंबरी वाचायला सुरूवात केली आणी भगवान श्रीकृष्णाचा व माझ्या मनाचा संवाद सुरू झाला.या आधी कितीतरी चरीञकारांनी श्रीकृष्णाचं चरीञ साकारलयं अवतार,चमत्काराच्या अट्टहासाने त्यांनी त्याला आपल्यापासुन शेकडो योजनं दुर नेलं.हे त्यांनी मुद्दाम केलं असं मला म्हणायच नाही....भारतीय समाजाचा सर्वात मोठा दोष म्हणजे आपण आपल्या देवतांना चमत्कारांमध्ये आणी महापुरूषांना जातिपातीमध्ये जखडुन ठेवतो. या कादंबरीच वैशीष्ट्य म्हणजे वाचत असताना श्रीकृष्ण देव,परमात्मा,भगवान असा कोणी दुरचा राहत नाही,तो कधी आपला मिञ,सखा,सोबती,भावविश्वस्त होऊन जातो हे कळत देखील नाही. म्रत्युंजय व युगंधरचा आक्रतीबं...

Comments
Post a Comment