पुण्यातील मानाचे गणपती | 5 Famous Ganpati In Pune | Incredible Media Production

पुण्यातील मानाचे गणपती | 5 Famous Ganpati In Pune | Incredible Media Production





श्री गणेश म्हणजे ज्ञान आणि समृद्धीची देवता. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो गणपती. कुठल्याही समारंभाची सुरुवात त्या विघ्नेश्वराच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही.

                              गणेशोत्सव आता जरी संपूर्ण भारतात आणि जगात साजरा केला जात असला तरी गणेशोत्सवाच जन्मस्थान हे पुणेच आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. हेतूहा होता या सन उत्सवाच्या निमित्ताने भारतीय लोक एकत्र येतील विचारांची देवाण-घेवाण होईल आणि त्यातून ब्रिटीश विरुद्ध लढण्यासाठी एक वज्रमुठ तयार होईल आणि झालही तसचं. तो आपल्या समृद्ध इतिहासाचा भाग आहे. या पुण्यातील गणेशोत्सवाच महत्व व मानाचे अशे 5 गणपती प्रतिष्ठाने आहेत त्यांची माहिती व इतिहास आपण समजावून घेऊयात.




१) कसबा गणपती :- विनायक ठाकर यांच्या घराजवळ एक गणेशमूर्ती सापडली. हे स्थान लाल महालाच्या जवळच होते त्यानंतर इ. स. १६३९ मध्ये छ. शिवाजी महाराज व मासाहेब जिजाबाईंनी तेथे एक सुंदर मंदिर बांधाल तोच हा कसबा गणपती.
                                   गणेशोत्सवामध्ये दहाव्या दिवसाच्या शेवटी विसर्जनाच नेतृत्व श्री कसबा गणपतीचं करतात. या मंडळातील मूर्ती विसर्जित झाल्यानंतरच इतर मंडळ त्याचं कार्य सुरु करू शकतात ही परंपरा आहे 


२) तांबडी जोगेश्वरी :-  तांबडी जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे १५ व्या' शतकात हे मंदिर बांधल आसल तरी दुर्गा देवीची मूर्ती कायम आहे ही पुणे शहराची संरक्षक देवता / ग्रामदेवता म्हणून देखील ओळखली जाते.
                                   येथील गणेशोत्सवाच्या शेवटी प्रत्येक वर्षी गणपतीची प्रतिमा विसर्जित केली जाते. आणि त्यापुढच्यावर्षी पुन्हा स्थापित केली जाते. 

३) गुरुजी तालीम :-  पुण्यातील गुरुजी तालीम हे तिसरे मनाचे गणपती आहे. १८८७ मध्ये प्रथम भिकू शिंदे आणि उस्ताद नालबन यांच्या हिंदू आणि मुस्लीम कुटुंबीयांनी त्याची स्थापना केली. याच कारणामुळे गुरुजी तालीम गणपती बाप्पा पुण्यातील हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक आहेत.

४) तुळशीबाग गणपती :-  पुण्यातील चौथा मनाचा गणपती. १९०१ मध्ये प्रथम मंडळाची स्थापना केली गेली. हा गणपती शहरातील सर्वात गर्दीच्या भागात स्थित आहे. मूर्ती १३ फुट उंच आहे. कलाकार डी. एस. खटावकर यांनी बऱ्याच वर्षापासून एथिल मूर्ती बनवल्या आहेत

५)  केसरीवाडा गणपती :-  हा मनाचा पाचवा गणपती इ. स. १८९४ पासून सुरु झाल्यापासून कुमठेकर रोड वरील विम्पुरकर वाड्यात आयोजित केला जात असे. मग १९०५ मध्ये ते गायकवाड वाडा म्हणजेच आताचे केसरीवाडा इथे हलवण्यात आले
                                              
                               

Comments

Popular posts from this blog

Mrutyunjay Marathi Book Review by Govind Joshi | मृत्यूंजय | Mrityunjay | shivaji sawant

Yugandhar Marathi Book Review by Govind Joshi | युगंधर | Shivaji Sawant | Jay shri krishna

Shivneri Fort | किल्ले शिवनेरी | संपूर्ण इतिहास व माहिती